पावस; पुढारी वृत्तसेवा : समुद्रात पोहण्यासाठी पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण गावखडी समुद्रकिनार्‍यावर पोहण्यासाठी उतरला असताना बुडाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश पांडुरंग सुतार, राजकुमार शेषराव पिटले, कृष्णा ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता गावखडी समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनार्‍यावर फिरताना आकाश सुतार (28) पोहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते.

पाण्याचा जोर वाढल्याने आणि पाण्याबाहेर येता न आल्याने आकाश बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने पोलीस अंमलदार व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध लागला नव्हता.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here