ओटवणे; पुढारी वृत्तसेवा : ओटवणे येथील प्रसिद्ध साडेचारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या संस्थानकालिन दसऱ्यातील खंडेनवमीला सोमवारी (४, ऑक्टो) पार पडली. राजेशाहीचा सण अशी सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या या दसऱ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावर्षी दसऱ्याच्या या सुवर्ण पर्वणीला हजारो भाविक रवळनाथ चरणी लिन होत रवळनाथाचा कृपा आशिर्वाद घेतला. देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची देवस्थानच्या दसऱ्याची प्रथा आहे. त्यामुळे दसऱ्यात वर्षातून एकदाच दर्शन घडणारे या देवस्थानचे सुवर्ण वैभव याची देही याची डोळा पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या उत्सवासाठी सावंतवाडी कोषागारात असलेले या देवस्थानचे सुवर्ण अलंकार व तरंगाच्या मुर्त्या रवळनाथ मंदिरात आणण्यात आल्या. मंगळवारी सकाळी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविल्यानंतर तिन्ही तरंगाना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात आले. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिवलग्न सोहळा झाला. यावेळी भाविकांनी सोने म्हणून लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांनी क्लेशपीडा परिहार्थ अग्नि स्नान केले. या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज पाहता आला. दसऱ्याची सांगता बुधवारी सायंकाळी खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने सांगता होणार आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनीही रवळनाथाचे दर्शन घेतले.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here