देवगड ः पुढारी वृत्तसेवा : देवगड तालुक्यातील शिरगाव अभयनगर येथील एकनाथ चौकेकर यांच्या घरावर वीज पडून 1 लाख 20 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी 6.45 वा.च्या सुमारास घडली. जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. याचा फटका चौकेकर कुटुंबीयांना बसला.

शनिवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरामध्ये एकनाथ चौकेकर व त्यांची पत्नी होती. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. तलाठी श्रीमती एस. ए. खरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here