Uddhav Thackeray Camp MP Rajan Vichare Letter To Maharashtra Police : आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. संरक्षणात कपात करण्यात आल्यानं विचारे चांगलेच संतापलेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना पत्र देऊन त्यांनी कपात केलेली सुरक्षा पुन्हा देण्याची मागणी केली आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आपल्याला रात्री-अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे एखादी दुदैवी घटना घडू शकते असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवले आहे. राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका आहे. आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असेही विचारे यांना या पत्रात म्हटले आहे.

माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना खासदार राजन विचारे यांचे पत्र

विचारे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये सध्या सूडबुद्धीने राजकारण केले जात आहे.  ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस नोंदवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन हे सर्व होत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या दडपशाहीबाबत आम्ही आपणस दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेले पत्र, असे सुरुवातीला विचारे यांनी पत्रात संदर्भ देताना म्हटले आहे.  

महाराष्ट्र सरकारकडून आणि प्रशासनकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिखावणीखोर प्रकार कथाकथीत स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला आहे, असा इशारही या पत्रात दिला आहे.

माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने मला सातत्याने रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला 2019च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत 7 लाख 40 हतार 969 मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कमपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटते, असे थेट आरोप राजन विचारे यांनी पत्रातून केला आहे.

1 COMMENT

  1. Having read this I believed it was extremely enlightening.
    I appreciate you taking the time and effort to put this short article together.
    I once again find myself personally spending a lot of time both
    reading and posting comments. But so what, it was still
    worthwhile!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here