
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या शहरातील पाग येथील घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप, पेट्रोलच्या बॉटल्स व दगड आढळल्याने खळबळ उडाली आहे. आमदार जाधव सध्या मुंबईमध्ये आहेत.
शिवसेनाप्रमुख व मातोश्री यांच्यावर जहरी शब्दांत टीका करून शिवसेनेला मत देऊ नका, असे सांगणारे आमदार भास्कर जाधव हे मातोश्रीवर भांडी घासतायत. अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपच्या चिपळूण शहर कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार जाधव यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला जाधव यांनी काल कुडाळ येथील सभेत जोरदार प्रत्युत्तर देत राणे पिता पुत्रांवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञाताकडून आमदार जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना ऊत आला आहे.
हेही वाचा :