
सिंधुदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवार (दि.२०) सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बनसोड यांची नियुक्ती करण्यात अआली आहे. बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते. राज्यातील २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सायंकाळी उशिरा निघाले आहेत.