
सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा ओरोस-सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी आले. शुक्रवारी याबद्दल स्थगिती येते न येते तोच सायंकाळी पुन्हा दाभाडे यांच्या जागी अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बढतीपर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
गुरुवारी झालेल्या आदेशामध्ये औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक म्हणून बढती देण्यात आली होती. तर दाभाडे यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण जाहीर केलेले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी दाभाडे हेच पुढील आदेश होईपर्यंत सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राहतील असे स्पष्ट करण्यात आले. तर सायंकाळी प्राप्त आदेशानुसार सौरभ कुमार अग्रवाल यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान दाभाडे यांना अद्याप नवीन जागी नियुक्ती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा :