खेड,पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ज्वालाग्राही पदार्थ वाहतूक करणारा टँकर भोस्ते घाटात एका अवघड वळणावर उलटला. त्‍यामूळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार,  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटात मंगळवारी सायंकाळी अवघड वळणावर घाट उतरणारा ज्वालाग्राही द्रव वायू वाहतूक करणारा टँकर उलटला. यामूळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे.

घाटातील मुंबईच्या व गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शिव व लवेल मार्गे वळवण्यात आली आहे. घाटात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. टँकर मधील वायू गळती होत असल्याने या टँकर परिसरात पाचशे मीटर परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अपघातामुळे सायंकाळी मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक खाेळांबा झाला आहे.

हेही वाचा  

‘गोकुळ’वर शासन नियुक्त संचालक निवड: शिंदे गट-भाजपसह दोन्ही खासदारांमध्ये रस्सीखेच

कोल्हापूर : मासेमारी भोवली; चार दिवसांवर लग्न असलेल्या वराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here