गुहागर; पुढारी वृत्तसेवा : शृंगारतळी मधील गणेशनगर येथे गादी कारखान्याला मोठी आग लागली. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत विरेंद्र चौघुले यांच्या गादी कारखानाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचे अद्याप कारण समजलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज सकाळी अचानाक या गादी कारखाण्याला आग लागल्याने परिसरात धावपळ उडाली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने विरेंद्र चौघुले यांचे राहते घर आणि गादी कारखान्याचे मोठे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, सरपंच संजय पवार, तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करत, आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती गुहागर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:









355 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here