
खोपोली, पुढारी वृत्तसेवा : झटपट श्रीमंत होण्यासाठी कोण काय करेल याबाबत सांगता येत नाही. अलीकडे बैलगाडा शर्यत सर्वाना परिचित आहे. मात्र कोंबड्यांची जीवावर बेतण्याच्या शर्यतीतून पैसे कमविण्यार्या उच्चभ्रू मंडळीही आहेत. खोपोली शहरातील तेज फार्म हाऊसमध्ये चक्क कोंबड्याच्या झुंज लावून सट्टेबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. यासह वाहनांसह 71 लाख 78 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली शहरातील तेज फार्म हाऊसमध्ये मुंबईसह परराज्यातील उच्चभ्रू मंडळी बंदी असलेल्या शर्यतीची मजा घेत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास फायटर कोंबडे घेऊन याठिकाणी सट्टेबाजाचा जुगार खेळणाऱ्या मंडळींना आमंत्रित केले होते. तेथे त्याची खाण्या पिण्याची व्यवस्था करून कोंबड्याच्या झुंज लावून रक्तरंजित आघोरी शर्यतीची मजा घेण्यासाठी जवळपास 100 हुन अधिक मंडळी या फार्म हाऊसमध्ये एकत्र जमली होती.
यावेळी कोंबड्याना ही मद्य पाजून त्याच्या पायाला ब्लेड लावून झुंज लावली जातअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून ३४ जणांना अटक केली.
हेही वाचा