सिंधुदुर्गनगरी;  पुढारी वृत्तसेवा :  उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेले आहे. सरकार पडेल, मध्यावधी निवडणुका होतील, अशी वक्तव्ये ते करीत आहेत. ते मुख्यमंत्री असताना कधीही ‘मातोश्री’च्या बाहेर पडले नाहीत. त्यांचा कारभार संपलेला आहे. राज्य हातातून गेल्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी केली.

राज्यातून बरेच उद्योग गेले, अशी ओरड विरोधकांकडून केली जात आहे. त्या मागची कारणे शोधून त्याची उत्तरे देत बसणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा केंद्रीय उद्योग आणि राज्य उद्योग विभाग यांची एकत्रित बैठक लवकरच घेतली जाईल. त्या माध्यमातून राज्यात लवकरच उद्योग पार्क सुरू करू, ज्यायोगे छोट्या-मोठ्या इंडस्ट्रीज राज्यामध्ये उभ्या राहतील आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल. बेरोजगारी कमी होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल, असे नारायण राणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here