खेड; पुढारी वृत्तसेवा :  कोकणात उपलब्ध जागा केंद्राला देऊन लॉजिस्टिक्स पार्कसोबतच किनार्‍यावरील जागेवर मरिन पार्क तसेच लोटे औद्योगिक वसाहतीसारख्या ठिकाणी मँगो पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच राज्य सरकार हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्य सरकार नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच दिल्लीत जाऊन मी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. गेल्या काळात वेदांता, सॅफ्रोनसारखे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे दुःख आहेच; पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. इंधन बचतीसाठी केंद्राकडून पेट्रोलियम पदार्थाच्या पर्यायार्थ हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात आली आहेत. त्याचा अभ्यास करून लवकरच राज्य सरकार हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here