
रत्नागिरी : जयगड पाठोपाठ आता रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनारीही डॉल्फीन माशांचा कळप मुक्तविहार करताना पाहायला मिळला. हे डॉल्फीन पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये सुमद्रकिनारी सकाळी आणि संध्याकाळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये आता भाट्ये समुद्रातील डॉल्फीन पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची भर पडली आहे. हे सर्व मंडळी डॉल्फीनचे छायाचित्रण आपल्या मोबाईलमध्ये करून घेत आहेत.