
खेड; पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील डिव्हायन केमिकल या कंपनीत वेल्डिंग काम सुरू असताना अचानक ठिणगी पडून आग लागली. या वेळी जवळच ठेवलेल्या रसायनाचे कॅन पेटले. या आगीत पाचजण भाजले गेले. ही दुर्घटना आज (रविवार) सकाळी घडली.
कोकणातील सर्वात मोठी रासायनिक औद्योगिक वसाहत खेड तालुक्यातील लोटे येथे आहे. या वसाहतीत सातत्याने अपघातांची मालिका गेल्या काही वर्षात सुरू आहे. आज (रविवार) सकाळी पटवर्धन लोटे येथील औद्योगीक वसाहतीमधील डिव्हायन केमिकल या छोट्या कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी अचानक ठिणग्या पडून आग लागली.कारखान्यात ठेवलेले रसायनाचे ड्रम पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत कारखान्यात उपस्थित पाच कामगार (नावे समजू शकली नाहीत) हे होरपळले. औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली असून कारखान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा :