
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांपूर्वी बकर्या चरण्यासाठी गेलेल्या मैथिली प्रविण गवाणकर (रा. चिंचवाडी, खेडशी, रत्नागिरी) या तरुणीचा डोक्यात दगड घालून तिचा निर्घूण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या तरुणाची गुरुवारी न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. (Ratnagiri)
निलेश उर्फ उक्कु प्रभाकर नागवेकर (वय ३५, रा. खेडशी, रत्नागिरी) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनाबाबतची तक्रार मैथीलीचे वडिल प्रविण गवाणकर (वय ४३, रा.खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, ९ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी मैथिली बकर्या चरण्यासाठी खेडशी येथील मोडा जंगल परिसरात गेली होती. सायंकाळी ६ वा. बकर्या घरी परतल्या होत्या परंतु मैथीली घरी न परतल्याने तिच्या आईने ही बाब प्रविण गवाणकर यांना सांगितली. त्यांनी मैथीलीच्या मोबाईलवर फोन केला परंतु ती फोन उचलत नव्हती. म्हणून त्यांनी जंगलात जाऊन पाहिले असता त्यांना मैथीली कुठेही आढळून आली नाही. (Ratnagiri)
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांना एक मृतदेह मिळालेला होता. हा मृतदेह चेहरा विद्रुप झालेल्या अवस्थेतील होता. अधिक तपासानंतर हा मृतदेह मैथिलीचा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी निलेश नागवेकर या तरुणाला या प्रकरणात अटक केली. त्यानंतर हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. मुदस्सर डिंगणकर यांनी ४ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी निलेशची निर्दोष मुक्तता केली.
मुंबई : सिगारेटच्या पेटत्या तुकड्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये आग https://t.co/Ckqu5LmQDV #Mumbai #Fire #APMCmarket
— Pudhari (@pudharionline) November 17, 2022
हेही वाचा