पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : नवीन पनवेल भागात राहणार्‍या ओमर ब्यापारी (वय २२) याच्‍या खूनाचा छडा लावण्‍यास खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात ओमर याची हत्या त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केल्‍याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ओमरची पत्नी अस्मीरा खातून ब्यापारी (वय २४), तिचा बांगलादेशी प्रियकर पप्पू उर्फ शफीक उल अहमद (वय २५) आणि त्याचे दोघे साथीदार अशा चार जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ओमर फारुक हा मूळचा पश्चिम बंगालमधील होता. अस्मीरा खातून हिचा पूर्वी जहांगिर मोडल याच्यासोबत विवाह झाला होता. त्याच्यापासून तिला सात वर्षांची मुलगी आहे. त्यानंतर अस्मीराने डिसेंबर २०२१ मध्ये पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यानंतर ओमरसोबत लग्न केले होते. त्यानंतर हे दाम्‍पत्‍य रोजगारासाठी नवीन पनवेलमध्ये आले. आरोपी पप्पू उर्फ शकील उल अहमद मुळचा बांग्लादेशी असून तो देखील कामानिमित्त पनवेलमध्ये आला होता. त्याला राहण्यासाठी घर नसल्याने जुलै महिन्यामध्ये ओमरने त्याला आपल्या घरी काही दिवसांसाठी आसरा दिला होता.

दरम्यान, आरोपी पप्पू आणि ओमरच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले.  पप्पुने ओमरला कायमचे सोडून त्याच्यासोबत राहण्यास अस्मीराच्या पाठीमागे तगादा लावला. अस्मीराने पती ओमरचा कायमचा काटा काढल्यानंतर त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले.

पप्पूने ओमरचा खून करण्यासाठी पश्चिम बंगाल येथून आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतले होते.  या तिघांनी १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ओमरला नवीन पनवेल, सेक्टर-१८ मधील सिडको गार्डनजवळ गाठून त्याच्या गळ्यावर, मानेवर आणि तोंडावर धारदार हत्याराने वार करुन त्याचा खून केला. यानंतर घटनास्‍थळावरुन पलायन केले. ओमरच्या पत्नीने  स्वतः खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

प्रियकरने त्याला मारल्याचा संशय व्यक्त केला होता. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकणाचा तपास सुरु केला. या तपासादरम्यान ओमरच्‍या खूनात  पत्नी अस्मीरा आणि तिचा प्रियकर पप्पू या दोघांचा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांना  ताब्यात घेतले. त्यानंतर पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारी असलेल्या तरीकुल महेश मंडल आणि किताबुल अब्दुल वाहिद या दोन आरोपींना अटक केली.

हेही वाचा :  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here