दापोली; पुढारी वृत्तसेवा :  दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असणारे बहुचर्चित साई रिसॉर्ट दि. 22 रोजी तुटेल, असा दावा करत सोमवारी सोमय्या दापोलीत आले होते. मात्र, यावेळी साई रिसॉर्टवर कारवाई न होता मुळे यांच्या सी-कौच रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे साई रिसॉटवरील कारवाईचा मुहूर्त मंगळवारी तरी टळला आहे. यामुळे सोमय्या यांचा साई रिसॉर्ट तुटेलच असा करत असलेला दावा फोल ठरला आहे.

मुरुड येथील साई रिसॉर्ट हे माजी मंत्री अनिल परब यांचे असल्याचा दावा वारंवार किरीट सोमय्या करत आहेत. मात्र, सोमय्या यांचा हा दावा अनेक वेळा अनिल परब यांनी खोडून काढला असून साई रिसॉर्ट हे सदानंद कदम यांचे मालकीचे आहे. याबाबत कदम यांनी संबंधित सर्व विभागात कागदपत्रे सादर केली आहेत. तरी ही रिसॉर्ट माझे आहे, असे सांगत सोमय्या हे राजकीय मुद्दा करत आहेत, असे परब सांगत आहेत.

सोमय्या यांनी हे रिसॉर्ट अनिल परब यांचे असल्याचा दावा करत 22 रोजी ते दापोलीत पुन्हा हातोडा घेऊन मुरुड येथे गेले होते. यावेळी साई रिसॉर्ट कधी पडेल, असा सवाल पत्रकार यांनी सोमय्या यांना केला असता महिनाभरात साई रोसॉर्ट पडेल, असा दावा त्यांनी आजही केला आहे. गेले वर्षभर सोमय्या हे साई रिसॉर्ट पडेल, असा दावा करत असताना अद्याप त्याची वीटही हलली नाही.
साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे असताना परब हे तो मी नव्हेच, असा पवित्रा घेत आहेत असे सोमय्या बोलत आहेत.आज सी कौच रिसॉर्ट तोडले, आहे उद्या असेच साई रिसॉर्टही तुटेल असा आत्मविश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. दरम्यान, साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात सोमय्या हे सकाळी 10 वाजता दापोली पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. त्या नंतर ते प्रांत कार्यालय येथेही गेले होते. पुढे त्यांनी मुरुड येथे सी कौच रिसॉर्ट या ठिकाणी शासकीत जागेवर कारवाईचा हातोडा मारला.

साई रिसॉर्ट हे न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे साई रिसॉर्टचे टेंडर निघाले नाही. याबाबत निश्चित कालखंड सांगता येणार नाही.आता फक्त सी कौच रिसॉर्टचे बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– जे.एम.पटेल,
उपविभागीय अभियंता, दापोली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here