मुंबई : मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, बीएमसीने मुंबईत २९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत २४ तास पाणीकपात जाहीर केली आहे. या २४ तासांत १० वॉर्डांमध्ये (Mumbai water cut) पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, MIDC, SEEPZ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरांचा प्रमुख भाग समाविष्ट आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर भागात २९ नोव्हेंबरला म्हणजे आज पाणीकपात होणार आहे. आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात ३० नोव्हेंबरला पाणी पुरवठ्यात कपात होणार आहे. मात्र, उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे.

Monkeypox Virus : मंकीपॉक्स आजाराला आजपासून म्हणा…, WHO ने बदललं नाव; कारणही महत्त्वाचं
ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू मेट्रो भागात २९ आणि ३० नोव्हेंबरला पाणीटंचाई जाणवणार आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पाणीपुरवठ्यात कपात करताना कूपर हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्यासाठी बीएमसीच्या टँकरचा वापर केला जाईल.

‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here