drishyam style murder: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. २६ वर्षीय श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आफताबविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आफताबनं हत्येआधी दृश्यम चित्रपट पाहिला होता. तशी माहिती त्यानं पॉलिग्राफनं टेस्टमध्ये दिली. अशीच काहीशी घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली.

मेंढपाळ आणि अन्य काही जणांनी गौतमला गवरिदल गावात भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह आपल्याच अंगणात पुरला. पोलिसांनी कॉल तपशील तपासून त्याच्या आधारे केवळ १४ दिवसांत प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी तरुणाला फोन करणारी तरुणी आणि दोन्ही मारेकऱ्यांना अटक करून चौकशी केली.
पोलीस आरोपीला मृतदेह पुरलेल्या ठिकाणी घेऊन गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत तरुण गौतमचे वडील जयंतीभाई गोहेल यांनी या प्रकरणात शैलेश उर्फ कालो लक्ष्मण जपदा, त्याचा भाऊ सागर लक्ष्मण जपदाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. मुलगा गौतम १४ नोव्हेंबरला रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याचं जयंतीभाई यांनी तक्रारीत म्हटलं होतं. यानंतर पीएसआय एम. एच. यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.