नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या संशोधन टीमने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज ५.८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. एसबीआय रिसर्च टीमने उत्पादन क्षेत्रातील कमकुवतपणा आणि मार्जिनचा वाढता दबाव लक्षात घेऊन आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली आहे.

एसबीआय रिसर्चने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. एसबीआयच्या संशोधन टीमच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर ५.८ टक्के असू शकतो, जो सरासरी अंदाजापेक्षा ०.३० टक्के कमी आहे. जुलै-सप्टेंबर २०२२ तिमाहीचे जीडीपी आकडे सरकार ३० नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे.

अदानी यांच्याही पुढे मुकेश अंबानींचा अंदाज, म्हणाले – “२०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था…”
विकासदराचा अंदाज कमी होण्याचे कारण
एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या म्हणण्यानुसार, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या ऑपरेटिंग नफ्यात दुसऱ्या तिमाहीत १४ टक्क्यांनी घसरण झाली आहे, हा नफा एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ३५ टक्क्यांनी वाढला होता. अहवालानुसार, या तिमाहीत या कंपन्यांच्या महसुलात वाढीचा दर चांगला राहिला आह. परंतु वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्यांच्या नफ्यात सुमारे २३ टक्क्यांनी घट झाली आहे.

अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट; गोल्डम साकसह पतमानांकन संस्थेने विकासदर घटवला
याशिवाय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राव्यतिरिक्त सूचिबद्ध कंपन्यांच्या मार्जिनवरही दबाव दिसून आला आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांचे ऑपरेटिंग मार्जिन दुसऱ्या तिमाहीत १७.७ टक्क्यांच्या तुलनेत घसरून १०.९ टक्क्यांवर आले. एसबीआय रिसर्चचा असा विश्वास आहे की अशा परिस्थितीत, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ५.८ टक्के असू शकतो, जो सरासरी बाजार अंदाजापेक्षा (६.१ टक्के) कमी आहे.

जगावर मंदी, भारत मात्र तेजीत; GDPबाबत आली गुड न्यूज!
चालू आर्थिक वर्षात विकास दराचा अंदाज
यासह, चालू आर्थिक वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी विकास दर ६.८ टक्के असू शकतो, जो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मागील अंदाजापेक्षा ०.२० टक्के कमी आहे. घोष म्हणाले की, या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान आर्थिक घडामोडींमध्ये मंदी होती. परंतु ऑक्टोबरमध्ये आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा झाल्यामुळे तिसऱ्या तिमाहीत आकडेवारीत सुधारणा अपेक्षित आहे. जागतिक अस्थिरता, चलनवाढीचा दबाव आणि बाह्य मागणी कमी असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here