दरम्यान, रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून यादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये ५.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या, कंपनीचा स्टॉक तीन महिन्यांनंतर म्हणजे १० जून २०२२ नंतर उच्च पातळीवर आहे. २९ एप्रिल रोजी कंपनीचा शेअर २,८५५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
शेअर बाजारातील दिवसभराच्या तेजीत रिलायन्सला ६१,५०० कोटी रुपयांचा नफा रिलायन्सच्या शेअर्समध्ये सुमारे साडेतीन टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर शुक्रवारच्या तुलनेत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ६१,५६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर लक्षात घ्या की बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १८,३२,०९७.१० कोटी रुपयांवर पोहोचले सौं गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी कंपनीचे मार्केट कॅप १७,७०,५३२.२० कोटी रुपये होते. याशिवाय गेल्या आठवड्यात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये १२,१९२.४८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
रिलायन्स रिटेलचा नवीन विभागात प्रवेश
मीडिया अहवालानुसार, रिलायन्स रिटेल आर्टिफॅक्ट्सच्या व्यवसायात उतरण्याच्या विचारात असून त्यांचे पहिले कारागीर केंद्रित स्टोअर ‘स्वदेश’ दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये उघडले जाईल. गिफ्टिंग सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने रिलायन्ससाठी मोठी संधी मिळेल, कारण हा विभाग मोठ्या प्रमाणात असंघटित असून फक्त काही संघटित लोकांची संपूर्ण भारतात उपस्थिती आहे.
बाजार विक्रमी पातळीवर बंद
तर आज शेअर बाजार २०० हून अधिक अंकांच्या वाढीसह विक्रमी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २११.१६ अंकांच्या वाढीसह ६२,५०४.८० अंकांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान, सेन्सेक्सने ६२,७०१.४० चा सर्वकालीन उच्चांक गाठला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० अंकांनी वाढून १८,५६२.७५ अंकांवर बंद झाला.