औरंगाबाद : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार करून गरोदर राहताच तिच्या पोटावर लाथ मारल्याप्रकरणी रिपाइंच्या (आठवले गट) युवक शहराध्यक्षाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब पक्षाच्या वरिष्ठांना कळतात सदर पदाधिकाऱ्याची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जयकिशन उदकराम कांबळे (वय-३१, रा.संघर्षनगर, मुकुंदवाडी) असं गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जयकिशन कांबळे याची पीडितेशी ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. यानंतर कांबळे याने पीडितेच्या पतीला धमकी देत मला तिच्याशी लग्न करायचे आहे, तिला सोडून दे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तू जर सोडले नाही तर तुला संपवून टाकेन, अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर पीडितेच्या पतीने पीडितेला सोडून दिले होते. यानंतर पीडिता आईच्या घरी राहू लागली.

माझ्या बॉयफ्रेंडसोबत फिरतेस काय! ५ तरुणांनी एकीला जत्रेत बेदम मारलं; लाथाबुक्क्यांनी हाणलं

दरम्यानच्या काळात कांबळे याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. गर्भवती असताना पीडितेने वारंवार आरोपीकडे लग्नाची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करत होता. शिवाय पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आरोपीने पीडितेसोबत संबंध ठेवतानाचा एक व्हिडिओ पीडितेच्या नकळत बनविला होता. तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी वारंवार देत होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

आजाराचा बहाणा करून आरोपीने पीडितेकडून २३ हजार रुपये देखील उकळले होते. दोघांमध्ये वाद झालयानंतर आरोपीने पीडिता गर्भवती असताना तिच्या पोटात लाथ मारली होती. त्यामुळे तिचा गर्भपात झाला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्याची माहिती कळताच रिपाइंचे शहराध्यक्ष नगराज गायकवाड यांनी कांबळेची पक्षातून ५ वर्षांसाठी हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here