fighting viral video navi mumbai maharashtra, VIDEO : जेवणाचा घास, बिअर, टेबल, सगळं फेकून मारलं; नवी मुंबईत हॉटेलमधील हाणामारी व्हायरल – fighting video in navi mumbai hotel went viral
नवी मुंबई : राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे. दिवसभरात असंख्य अशा घटना समोर येतात ज्यातून भयंकर गुन्हे घडतात. अशात नवी मुंबईच्या एका हॉटेलमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सगळेजण आपल्या टेबरवर बसून जेवत असताना असं काही झालं की क्षणात हॉटेलचं भंगाराच्या दुकानात रुपांतर झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथील क्वालिटी पंजाब हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यात दोन जीआरपी कॉन्स्टेबलना मारहाण केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी २ जणांना अटक केली आणि आणखी १० जणांवर गुन्हा दाखल केला. GRP कॉन्स्टेबल दीपक कोल्हे (४१) आणि त्याचा मित्र गुरुवारी रात्री उशिरा सेक्टर १४ मधील क्वालिटी पंजाब हॉटेल, कोपरखैरणे इथे जेवत होते. दरम्यान, शेजारील टेबलवर आणखी दोन लोक दारू पीत होते. ‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच याचवेळी शेजारील टेबलावर दारू पिऊन बसलेल्या दोन तरुणांचा त्यांच्याशी वाद झाला. यानंतर सुमारे १२ जणांच्या टोळक्याने दोन्ही जीआरपी कॉन्स्टेबलवर हल्ला केला. टेबल, खुर्च्या आणि बिअरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. यामध्ये दोघे जखमी झाल्याची माहिती आहे.
तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे सगळेजण आपल्या टेबलवर बसून जेवत आहेत. पण यानंतर एक व्यक्ती जेवणाच्या ताटावरून उठतो आणि थेट सुरू होते हाणामारी. अगदी जेवणाच्या ताटावरच कॉलर पकडून सुरू असलेल्या या हाणामारीचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.
यामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर रागाच्या भरात लोकांनी थेट जेवण, ताटं, खुर्च्या आणि टेबर एकमेकांवर फेकून मारल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.