मुंबई : मुंबईच्या अंबोली इथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. इथे क्लासवरून घरी जात असलेल्या मुलीवर सहज जीव जडला. यानंतर रोडरोमिओने असं काही केलं आता त्याला जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. दोन मैत्रिणी घरी जात असताना आरोपी तरुण हा कारमध्ये मित्रासोबत बसला होता. मुलीला बघताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

यानंतर घाबरून मुलींनी रिक्षा पकडली. पण तरुणाने रिक्षाचाही पाठलाग करत ट्रॅफिकमध्ये गाडी थांबली असता मुलीकडे चिठ्ठी दिली आणि ‘इसमे मेरा नंबर है’ असं म्हणून निघून गेला. घाबरलेली तरूणी घरी पोहोचली आणि तिने घडलेली घटना आपल्या वडिलांनी सांगितली.

VIDEO : जेवणाचा घास, बिअर, टेबल, सगळं फेकून मारलं; नवी मुंबईत हॉटेलमधील हाणामारी व्हायरल
वडिलांनी तातडीने पोलीस स्थानक गाठत तरुणाविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी मध्यरात्री चिठ्ठीतील नंबरवर फोन केला असता फोन थेट सलमान कुरेशी या आरोपी तरुणाला लागला. सुरुवातीला तो मुलीचाच फोन आला असल्याचं समजत आनंदी झाला पण नंतर आपण पोलिसांच्या तावडीत सापडल्याचं तरुणाच्या लक्षात आलं.

अंबोली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सलमान कुरेशीविरोधात विविध कलमे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here