बंगळुरू: कर्नाटकातील एका व्यक्तीच्या पोटातून १८७ नाणी काढण्यात आली आहेत. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्यानं व्यक्ती रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी त्याच्या विविध चाचण्या केल्या. एंडोस्कोपीदेखील करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांना त्याच्या पोटात अनेक नाणी आढळून आली. शस्त्रक्रिया करून एक, दोन, पाच रुपयांची नाणी काढण्यात आली.

रायचूर जिल्ह्यातल्या लिंगसुगूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या ५८ वर्षीय दयमप्पा हरिजन यांना सिजोफ्रेनिया नावाचा आजार आहे. २६ नोव्हेंबरला दयमप्पा यांचं पोट दुखू लागलं. मुलगा रवी कुमार त्यांना घेऊन बागलकोटच्या एस. निजलिंगप्पा वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एच. एस. के. रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी लक्षणं पाहून एक्स रे आणि एंडोस्कोपीचा सल्ला दिला.
माझ्या बॉयफ्रेंडसोबत फिरतेस काय! ५ तरुणांनी एकीला जत्रेत बेदम मारलं; लाथाबुक्क्यांनी हाणलं
दयमप्पा यांच्या पोटात १.२ किलो वजनाची नाणी असल्याचं ऍब्डोमन स्कॅनमध्ये दिसून आलं. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. दयमप्पा यांना सिझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. हा आजार झालेल्या रुग्णांच्या विचार करण्याची क्षमतेवर परिणाम होतो. त्यांचं वर्तन सामान्यांसारखं नसतं. दयमप्पा यांच्या पोटातून १८७ नाणी काढण्यात आली. त्यात ५ रुपयांच्या ५६, २ रुपयांच्या ५१ आणि १ रुपयाच्या ८० नाण्यांचा समावेश आहे.

वडील मानसिकरित्या अस्वस्थ आहेत. मात्र ते त्यांची दैनंदिन कामं करतात, असं दयमप्पा यांच्या मुलानं सांगितलं. नाणी गिळत असल्याचं दयमप्पा यांनी घरात कोणालाच सांगितलं नव्हतं. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं. मात्र तेव्हाही त्यांनी नाणी गिळण्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्यांच्या पोटात १.२ किलोची नाणी असल्याचं आम्हाला ऍब्डॉमन स्कॅनमधून समजल्याचं दयमप्पा यांचा मुलगा म्हणाला.
गळ्यात घुसलं १५० वर्षे जुनं त्रिशूळ; ६५ किमी अंतर कापून त्यानं रुग्णालय गाठलं अन् मग…
पोटातून नाणी काढण्याची शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, असं डॉ. ईश्वर कलबुर्गी यांनी सांगितलं. शस्त्रक्रिया अवघड होती. रुग्णाचं पोट एखाद्या फुग्यासारखं फुललं होतं. पोटात प्रत्येक ठिकाणी नाणी होती. ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही सीआरच्या माध्यमातून नाणी शोधली. कुठे-कुठे नाणी आहेत ते पाहिलं आणि मग ती काढण्यात आली, अशी माहिती कलबुर्गींनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here