Maharashtra Political crisis | सत्ता गेल्यापासून सीमाप्रश्नावर बरेचजण बोलत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे असताना सुरुवातीच्या काळात बेळगाव, कारवार आणि निपाणीचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनावेळी लाठीचार्ज झाला, अनेक बळी गेले. तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते, आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता. आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांचा कधीच संबंध नव्हता.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत फक्त अडीच तास बसले
- उद्धव ठाकरे यांना सीमाप्रश्नाबाबत बोलण्याचा अधिकार नाही
यावेळी नारायण राणे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांचे बुलढाण्यातील भाषण, सीमाप्रश्नावरुन ठाकरे गटाकडून होणारी टीका, राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेली टीका अशा विविध मुद्द्यांवर नारायण राणे यांनी भाष्य केले.
आता संजय राऊत कमी बोलत आहेत. पण शरद पवार जास्त बोलायला लागले आहेत. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कोणालाही देऊ नये, हेच भाजप पक्षाचे ठाम मत आहे. त्यामुळे पवारांच्या मताला फार किंमत नाही. पवार साहेबांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे, हे जनतेला माहिती आहे. आपण महाराष्ट्राच्या भागाबाबत चर्चा करण्यास हरकत नाही. पण सीमाभागाबाबत असे बोलू नये, असा सल्ला नारायण राणे यांनी शरद पवार यांना दिला.
सत्ता गेल्यापासून सीमाप्रश्नावर बरेचजण बोलत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे असताना सुरुवातीच्या काळात बेळगाव, कारवार आणि निपाणीचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनावेळी लाठीचार्ज झाला, अनेक बळी गेले. तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते, आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता. आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांचा कधीच संबंध नव्हता. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात उद्धव ठाकरे कधीही मराठी माणसाच्या हक्कांच्या आंदोलनासाठी कुठेही गेले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सीमाप्रश्नाबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंना प्रशासन सांभाळणं कधी जमलंच नाही: नारायण राणे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत फक्त अडीच तास बसले. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत सत्ता असताना आणि गेल्यानंतरही काही करु शकले नाही. उद्धव ठाकरे यांना प्रशासन सांभाळणे जमत नाही. उद्धव ठाकरे आणि आंदोलन जमत नाही. उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही शिवसैनिकाचं घर वसवलं नाही, कोणाला लग्नकार्याला पैसे दिले नाहीत, दंगलीत कोण मृत्यू पावला, पैसे दिले नाहीत. ३९ वर्षांमध्ये पैसे द्यायला आम्ही पुढे येतो. जायचं, बघायचं, सांत्वन करायचं आणि पैसे देण्यासाठी आम्ही असायचो. अशाने शिवसेना कशी टिकेल, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.