पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने ‘एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP’ असं स्टेट्स व्हॉट्सअपवर ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील केडगाव मधील एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संकते प्रकाश लोणकर असं या तरुणाचं नाव आहे.

हिंगोलीत हाय व्होल्टेज ड्रामा, विजेच्या प्रश्नावरून गावकरी आक्रमक; टॉवरवर चढले आणि…

संकेत लोणकर याने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेण्याचे प्रतिकात्मक व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. ‘एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP ‘, असं स्टेट्स संकेतने व्हॉट्सअपवर ठेवलं होतं. त्यानंतर संकेतने त्याच्या रुमची आतून कडी लावली. सकाळी जेव्हा कुटुंबियांनी स्टेट्स पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी रुमचा दरवाजा ठोकला परंतु आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला असता संकेतचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने व आईने ज्या युवकाशी तिने लग्न केले त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी मयुर संजय चव्हाण व सुनीता संजय चव्हाण (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव कॉलनी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र बबन वाबळे (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव कॉलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली.

IND vs NZ – उद्या तिसरा वनडे सामना! मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठी आव्हाने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here