औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. एस.टी आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागेवरच ठार झाले आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढोरेगावर परिसरात हा अपघात घडलाय. ही बैलगाडी ऊसतोड करणाऱ्या मजुराची होती. या घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गिरे परिवार नाशिक येथील असून औरंगाबादेत ते ऊसतोडीसाठी आले होते. सकाळी ते बैलगाडीने ऊसतोडी करण्यासाठी शेतात जात होते. दरम्यान, इसारवाडी फाट्याजवळ असलेल्या लोखंडी पुलावर एस.टी.ने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेनंतर बैलगाडीवरील चौघेजण दूरवर फेकले गेले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

फक्त एक टी-२० मॅच खेळणाऱ्याचे नाव कर्णधारपदासाठी; माजी खेळाडू म्हणाला, टीम इंडियाचे नशीब बदलेल
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कालीयाबाई आणी अर्जुन गिरे या दोघांना मृत घोषित केले. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की, बैलगाडीला जुंपलेला एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी आहे. या अपघातात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या रस्त्यावर दोन दिवसातील हा दुसरा अपघात असून नेहमी या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अपघातात कुणाची चूक होती हे स्पष्ट झाले नसून या अपघात प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अपघातात ठार झालेल्यांची नावे :-

१. कलीयाबाई गोविंद गिरे

२. अर्जुन गोविंद गिरे

अपघातात जखमी झालेल्यांची नावे :-

१. गोविंद विठ्ठल गिरे

२. बाळू गोविंद गिरे

मैदानात तुफानी खेळी अन् मैदानाबाहेर संयम… धोनीच्या शिष्यानं कधीच घडलं नाही ते करुन दाखवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here