सोलापूर : सोलापूर शहराजवळ असलेल्या सोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये स्नेहलता प्रभू जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पती, लातूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेतल्याने राज्यभर याची चर्चा झाली होती. सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे या गळफास घेतल्याची नोंद झाली आहे. गळफास का घेतला?, किंवा तणाव काय होता? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. विजापूर नाका पोलिसांकडून अधिक महिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की, स्नेहलता प्रभू जाधव या मानसिकरित्या खचल्या होत्या. त्यांचे मेंदू रोग तज्ञाकडे उपचार देखील सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांचे पती व मुलगा यांचे जबाब अजूनही नोंद झाले नाही. लवकरच त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.

भावाला फोन करत त्यांनी केली होती आत्महत्या

स्नेहलता जाधव आणि लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाच्या लग्नाला बस्ता खरेदीसाठी कर्नाटक येथील चडचन या गावी गेले होते. येथून खरेदी करून परत येताना सोलापुरात रात्र झाली होती. एक रात्र सोलापुरातील एका लॉजमध्ये मुक्काम करून ते लातूरकडे रवाना होणार होते.

भाजप तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला; जळगाव शहरात कडकडीत बंद, खडसेंनी केला निषेध
मात्र २८ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रभू जाधव हे एकटेच कामानिमित्त सकाळी लवकर उठून लातूर कडे रवाना झाले. त्यावेळी स्नेहलता जाधव यांनी शिक्षक असलेल्या लातूर मधील भावाला फोन करून रडून रडून माहिती दिली व आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली.

त्यावेळी स्नेहलता जाधव यांच्या भावाने सोलापुरातील जवळच्या नातेवाईकांना ताबडतोब सोरेगाव येथील निशा हॉटेल कडे जाण्यास सांगितले. सोलापूर शहरात असलेल्या कर्णिक नगर येथील नातेवाईक ताबडतोब सोरेगाव कडे रवाना झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्नेहलता जाधव या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण;डॉक्टरांनी मृत घोषित केले

स्नेहलता जाधव यांना ताबडतोब खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजापूर नाका पोलीसानी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सरस्वती देवीने किती शाळा काढल्या?, किती लोकांना शिकवले?; छगन भुजबळांचे प्रश्नावर प्रश्न
त्याच दिवशी रात्री अंतिम संस्कारसाठी शव लातूरकडे रवाना करण्यात आले. लातूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरात आत्महत्या केली ही बाब वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली होती. विजापूर नाका पोलिसांनी गळफास बाबत त्याच दिवशी माहिती दिली होती. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.

१८ डिसेंबर २०२२ रोजी मुलाचे लग्न होते

स्नेहलता जाधव व प्रभू जाधव यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. १८ डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या मुलाचे लग्न होणार आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ते स्नेहलता जाधव व प्रभू जाधव हे चडचनला(कर्नाटक) येथे गेले होते. पण ऐनवेळी स्नेहलता जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने आनंदाचे वातावरण दुःखात परावर्तित झाले आहे.

द कश्मीर फाइल्स हा प्रचारकी, असभ्य चित्रपट, तो येथे पाहून धक्का बसला; मुख्य ज्यूरींनी साधला निशाणा
स्नेहलता जाधव यांनी गळफास घेतल्याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.लॉजमधून लातूर कडे जाताना प्रभू जाधव यांनी पत्नी स्नेहलता यांना सोबत का घेऊन गेले नाहीत.स्नेहलता जाधव यांनी गळफास घेण्या अगोदर लातूर येथील शिक्षक असलेल्या भावास कॉल करून काय माहिती दिली होती?.असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. लवकरच विजापूर नाका पोलीस याचा तपास करत खुलासा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here