बुलढाणा : घरात झोका खेळत असताना दोरीचा गळफास लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली आहे. शंकर प्रकाश शिंदे असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शंकर हा इयत्ता नववीत शिकत होता. खामगाव शहरातील जुना फैल भागात शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. आई-वडिलांसह घरातील सर्व मंडळी नातेवाईकांच्या लग्नासाठी अकोला येथे गेले होते. शंकर आणि त्याचे आजी आजोबा तिघेच घरी होते. शंकरच्या घराशेजारी मंदिराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करुन शंकर घरी आला. त्यानंतर खोलीतील पंख्यास दोरी बांधून तो झोका खेळू लागला.

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
झोका खेळताना झोक्याची दोरी पंख्याच्या पातीत अडकल्याने शंकराच्या गळ्याला दोरीचा फास बसला. ही बाब लक्षात येताच त्याला तात्काळ खामगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील एका ८ वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या घरात ९वी मध्ये शिकणाऱ्या चुलत बहिणीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. ईश्वरी रमेश भोसले असं मृत मुलीचं नाव आहे. ईश्वरी इयत्ता दुसरीमध्ये असून ती खरपुडी रोडवरील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ईश्वरीचे वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरी नगरमध्ये राहणाऱ्या आपल्या काकांकडे शिक्षणासाठी ठेवले होते.

गुलाबरावांना जळगावातच अस्मान दाखविण्याचा ठाकरेंचा डाव, निवडणुकीकडे राज्याचं लक्ष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here