नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच पशुपालनाचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाय, म्हशी, शेळीपालनातून भरीव उत्पन्न मिळवत आहेत. गुजरातमध्ये आढळणारी जाफ्राबादी जातीच्या म्हशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही म्हैस शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

जाफ्राबादी म्हशीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर

जाफ्राबादी म्हशीपासून चांगल्या प्रमाणात दूध मिळते. या म्हशीच्या दुधात ८% फॅट असते, ज्यामुळे शरीर मजबूत होते. या म्हशी गुजरातच्या गीर जंगलात आढळून येतात. जाफ्राबादी म्हैस दररोज तब्बल ३० ते ३५ लिटर दूध देते. हिशोब केला तर लक्षात येईल की या म्हशीची एका महिन्यात हजार लिटरहून अधिक दूध देण्याची क्षमता आहे.

राहुल गांधींसाठी राजस्थानातून गुड न्यूज, गेहलोत पायलट यांचं मनोमिलन, वेणुगोपालांकडून कामगिरी फत्ते
सिंहांशी लढण्याची क्षमता

जाफ्राबादी म्हैस अतिशय शक्तिशाली मानली जाते. गीर जंगलातील या म्हशीबद्दल असे म्हटले जाते की तिच्यात इतकी ताकद आहे की ती एका सिंहाशी देखील लढू शकते. या म्हशीची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे.

या म्हशीच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे

या म्हशीच्या आहाराची आणि आरामाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात संतुलन राखणे आवश्यक आहे. आहारात आपण काय देतोय याचा देखील समतोल ठेवावा लागतो. या म्हशीला हिरवा चारा जितका आवश्यक आहे तितकेच अन्नधान्यही आवश्यक आहे.

दुग्ध व्यवसायात चांगला नफा

शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायातून चांगला नफा मिळवायचा असेल तर ते या म्हशीपासून चांगला नफा मिळवू शकतात. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्जही दिले जाते. म्हशीचे दूध काढून थेट विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. विशेष बाब म्हणजे, या म्हशीचे रेडकू (पिल्ले) देखील खूप लवकर वाढतात. त्यांची विक्री करून त्यांचा चांगला नफाही मिळतो. एकूणच, जाफ्राबादी म्हैस पालनातून लाखोंपर्यंत नफा आपण कमावू शकतो.

पवारांच्या स्टेजवर जाऊन रान पेटवलं, त्याच आक्रमक नेतृत्वामुळे ठाकरेंकडून मोठी जबाबदारी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here