molestation case on Jitendra Awhad | हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातीलवरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्या ताईने स्वत:हून सांगितले की, मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही.

 

Jitendra Awhad case
जितेंद्र आव्हाड

हायलाइट्स:

  • हरहर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती
ठाणे : हरहर महादेव चित्रपटाच्या दरम्यान प्रेक्षकाला मारहाण, मुंब्रा येथे महिलेचा विनयभंग असे गुन्हे दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी हा सर्व प्रकार पूर्वनियोजित योजना असल्याचा भांडाफोड केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हिव्हियाना मॉलमध्ये जात हरहर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित व्यक्तीची महिलाही त्याठिकाणी उपस्थित होती. या महिलेने माझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी काही स्थानिक राजकारण्यांचे प्रयत्न सुरु होते, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले आहे. हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातीलवरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मी त्या ताईचा आभारी आहे की, त्या ताईने स्वत:हून सांगितले की, मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करत होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हे दोन नेते नेमके कोण आहेत, याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Gunaratna Sadavarte: ओ आव्हाड, ओ शरद पवार… स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाचे आरोप होत नाहीत: सदावर्ते

नेमकं काय घडलं होतं?

हर हर महादेव या वादग्रस्त चित्रपटाचा शो विवियाना मॉल येथे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट बंद पडला. मात्र याच दरम्यान आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आव्हाड यांना अटक देखील केली होती. मात्र, याप्रकरणात ठाणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
Jitendra Awhad: गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा डाव; आव्हाडांचा खळबळजनक आरोप

आव्हाडांचा एकनाथ शिंदेंना सावधानतेचा इशारा

हर हर महादेव प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्यामागे शिंदे गटातील चाणक्य असल्याचा आरोप केला होता. या चाणक्यापासून सांभाळून राहा, असा सल्लाही आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. चाणक्य नाही शकुनि मामा … शिंदे साहेब जपून रहा, अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले होते.

आव्हाड यांच्या ट्विटचा संबंध शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी असल्याची चर्चा होती.व्हिव्हियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. सर्व नियमांचे उल्लंघन करून आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने अटक झाल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. तसेच आव्हाड यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला होता. मी पोलिसांच्या ताब्यात असताना अधिकाऱ्यांना सतत एका चाणक्याचे फोन येत होते. या चाणक्याकडून जितेंद्र आव्हाड यांना पोलीस कोठडीत जेवणही मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here