सध्याच्या घडीला करोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातलेले आहे. पण करोनाबाधितांना मदत करणाऱ्या क्रिकेटपटूच्या घरीच आता करोना पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या क्रिकेटपटूच्या वडिलांनाच करोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. पण त्याच्या आईचा करोनाचा रिपोर्ट अजून आलेला नाही.

करोनाच्या काळात बऱ्याच लोकांवर वाईट परिस्थिती आलेली आहे. रोजंदार कामगारांवर उपासमारीची वेळही आली होती. त्याचबरोबर ज्यांना करोनाची बाध झाली आहे, त्यांना मदत करण्यासाठी काही लोकं आणि संस्था आता पुढे आलेल्या आहेत. हा क्रिकेटपटूही आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करोनाबाधितांना मदत करत असल्याचे समोर आले आहे.

या क्रिकेटपटूचे वडिल बँकेत कामाला होते. तिथे काही जणांना करोना झाला होता. क्रिकेटपटूच्या वडिलांना काही दिवसांपासून सर्दी आणि ताप आला होता. त्यानंतर त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वडिलांबरोबर त्याची आईही राहत होती. त्यामुळे तिचीही करोना चाचणी करण्यात आली. तिचा करोनाचा अहवाल आता उद्या मिळणार आहे.

हा क्रिकेटपटू आहे तरी कोण… ज्या क्रिकेटपटूच्या वडिलांना करोना झाला आहे, तो नेमका आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर तो आहे बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शकिब अल हसन. शकिबच्या घरी काही दिवसांपूर्वीच पाळणा हलला होता. त्यामुळे तो आपल्या बायकोबरोबर लंडनला आहे. पण शकिब आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करोनाबाधितांची मदत करत आहे. शकिबचे वडिल मश्रूफ रेझा यांना करोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर उपाच सुरु आहेत.

शकिबच्या आई-वडिलांची काळजी त्याची बहिण घेत आहे. याबाबत ती म्हणाली की, ” शकिबचे बाबा हे बँकेत कामाला जात होते. बँकेतील ६-७ जणांना करोना झालेला होता. त्यामुळे त्यांचीही करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले. शकिबच्या आईचीही करोना चाचणी झाली आहे आणि तिचा अहवाल उद्या मिळणार आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here