मुंबई: ‘अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री यांना शरद पवारांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) लागणार नाही अशी अपेक्षा आहे,’ असा खोचक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी हाणला आहे. (BJP Leader taunts CM )

वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची तारीख काल केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या ५ ऑगस्ट रोजी हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. देशात करोनाचा कहर असताना आलेल्या या वृत्तावर यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली होती. मंदिर बांधून करोना जाईल असं काहींना वाटतं आहे, असा खोचक टोला पवारांनी हाणला होता. पवारांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरलं आहे. ‘पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्याच्या वक्तव्यावर स्वत:ला हिंदू म्हणवणारे उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. तर, प्रवीण दरेकर यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

‘पहले मंदिर फिर सरकार अशी शिवसेनेची लोकसभा निवडणुकीची आधी घोषणा होती. पण मंदिर होण्याआधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होत आहे. मात्र, आता ते शरद पवारांसारखी भूमिका घेणार नाहीत. हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कशाचाही पर्वा करणार नाहीत. शरद पवारांच्या एनओसीचीही गरज त्यांना लागणार नाही असं आम्हाला वाटतं,’ असा चिमटा दरेकर यांनी काढला.

राम मंदिर उभारणीबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

‘करोनामुळं जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याचा विचार आम्ही करतोय. त्याला पहिलं प्राधान्य देतोय, पण काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल. त्यामुळं त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा,’ असं पवार म्हणाले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here