लग्न सोहळ्यात नाचताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ४० वर्षीय व्यक्ती इतर नातेवाईकांसोबत नाचताना दिसत आहे. नाचता नाचता अचानक ते खाली कोसळतात. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मनोज यांना तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मनोज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मनोज यांच्या आकस्मिक मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काही तासांपूर्वी सोबत असलेले, उत्साहात नाचणारे मनोज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं अनेकांना जड जात आहे.
नाचता नाचता मृत्यूनं गाठल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. त्यांचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. राजस्थानमध्ये एका लग्न सोहळ्यात स्टेजवर नाचणाऱ्या एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तर सप्टेंबरमध्ये जम्मूतील एक व्हिडीओ समोर आला होता. पार्वती मातेची भूमिका साकारणाऱ्या २० वर्षीय कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्यानं जीव गेला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.