खासगी प्रवासी बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मुंबईच्या घाटकोपरहून राजस्थानच्या उदयपूरला जात असलेल्या बसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. बस पालघरमधून जात असताना मृतदेह आढळल्याची माहिती मंगळवारी रात्री पोलिसांनी दिली.

 

bus
पालघर: खासगी प्रवासी बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मुंबईच्या घाटकोपरहून राजस्थानच्या उदयपूरला जात असलेल्या बसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. बस पालघरमधून जात असताना मृतदेह आढळल्याची माहिती मंगळवारी रात्री पोलिसांनी दिली.

बस उदयपूरला जात असताना एका प्रवाशाला त्याच्या शेजारचा व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याचा गळा कापण्यात आला होता. मृत व्यक्ती ठाण्याहून बसमध्ये चढला होता. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील कासा येथे बस असताना शेजारच्या प्रवाशानं रक्तबंबाळ स्थितीत असलेला मृतदेह पाहिला.
लग्नात नाचताना तोल गेला, जमिनीवर कोसळले; नातेवाईकांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याचं नव्हतं
बसमध्ये जखमी अवस्थेतील प्रवाशी असल्याचं लक्षात येताच चालकानं बस थेट कासा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. तिथे डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केलं. या घटनेची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here