नवी दिल्ली : सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करत आहेत. तुम्हीही आगामी काळात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आज सोने खरेदी करणं स्वस्त झालं आहे. मंगळवारी, सोन्याचा भाव १०१ रुपयांनी घसरून ५२,८३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. HDFC सिक्युरिटीजच्या मते, जागतिक ट्रेंडमध्ये कमजोरी दिसल्याने सोन्याचे भावही उतरले.

चांदीचे भावही घसरले…

चांदीचा भावही ३५३ रुपयांनी घसरून ६१,७४४ रुपये प्रति किलो झाला. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, सोन्याचा भाव एका आठवड्यापेक्षा जास्त काळातील नीचांकी पातळीवर आला आहे.

Earn Money: फक्त दोन रुपये द्या आणि ५ लाख मिळवा, कसे? वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७५३.२५ डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीची किंमतही प्रति औंस २१.२३ डॉलरवर आली. एचडीएफसी सिक्युरिटीजमधील संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कोमॅक्स गोल्डमध्येही घसरण झाली आहे.

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये काय आहे दर?

दुसरीकडे, मंगळवारी वायदा व्यवहारात सोन्याचा भाव २४३ रुपयांनी वाढून ५३,०४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, ऑक्टोबरमधील डिलिव्हरीचे करार २४३ रुपयांनी किंवा ०.४६ टक्क्यांनी वाढून ५३,०४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते.

RBI Imposes Penalty: RBI ने ९ बड्या बँकांवर ठोठावला १.२५ कोटींचा दंड, यामध्ये तुमचंही खातं आहे?
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याची किंमत

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल देऊ शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला किंमती कळवल्या जातील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here