पांढरे केस आणि पती-पत्नीत दुरावा
मिळालेल्या माहितीनुसार, सारण जिल्ह्यातील सहजितपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी बबिता देवी या महिलेचा विवाह बनियापूर पोलीस स्टेशन परिसरातील लुवा कला येथील रहिवासी पंकज साह याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच या पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण, घरातील वडिलधाऱ्यांनी दोघांना त्यांचं नातं जपण्याचा सल्ला दिला. मात्र, लग्नाच्या दोन वर्षानंतर पती पंकजने पत्नीचे पांढरे झालेले केस पाहिल्यानंतर घरात गोंधळ घालायला सुरुवात केली.
हेही वाचा –
पांढऱ्या केसांवरुन टोमणे
यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. पती तिला तिच्या पांढर्या केसांवरुन सतत टोमणे मारत असे आणि एक ना अनेक कारणावरून तिचा छळ करत असे. ज्याची फिर्याद बबिताने सहजपूर पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी दोघांमध्ये तडजोड करुन दिली. मात्र, पंकजच्या मनात काही औरच होतं. त्याने लपून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पत्नी घटनास्थळी
रविवारी (२७ नोव्हेंबर) संध्याकाळी पंकज मंदिरात दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता. स्थानिक लोकांनी ही माहिती बबिताला दिली आणि ती तिच्या वडिलांसह थेट घटनास्थळी धडकली आणि पतीला मारहाण करु लागली. हे सर्व पाहून पंकजसह सर्वजण मंदिरातून पळून गेले.
हेही वाचा –
मारहाण करुन बळजबरी माहेरी पाठवले
गर्भपातासाठी रसगुल्ला आणि भातामध्ये औषध मिसळून तिला खाऊ घालण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप बबिताने तिच्या सासरच्या मंडळींवर केला आहे. तिने हे खाण्यास नकार दिल्याने सासरच्यांनी तिला बेदम मारहाण करून बळजबरीने माहेरी पाठवले, असंही ती सांगते. त्यानंतर इकडे तिच्या पतीने पुन्हा लग्न करण्याची तयारी सुरु केली. याबाबत शेजाऱ्यांनी बबिताला माहिती देताच ती घटनास्थळी पोहोचली आणि पतीचे दुसरे लग्न थांबवले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.