Thane Crime News: डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक परिसरात काल सकाळच्या सुमारास एका ८५ वर्षीय वृद्ध महिला वॉक करत होती. यादरम्यान एका चोरट्यानं तिचा पाठलाग केला आणि संधी मिळताच तिच्या गळ्यातील ४० हजारांचं मंगळसूत्र घेऊन पळू काढला. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या.

 

thief arrested
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक परिसरात काल सकाळच्या सुमारास एका ८५ वर्षीय वृद्ध महिला वॉक करत होती. यादरम्यान एका चोरट्यानं तिचा पाठलाग केला आणि संधी मिळताच तिच्या गळ्यातील ४० हजारांचं मंगळसूत्र घेऊन पळू काढला. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या.

काल सकाळी देवी चौक परिसरात वृद्ध महिला चालत होती. त्यावेळी एका तरुणानं तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्याला फार कोणी नाही याची खात्री पटताच त्यानं संधी साधली. वृद्ध महिलेचं तोंड व गळा दाबून तिला जमिनीवर पाडून चोरट्यानं तिच्या गळ्यातील ४० हजार किमतीचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलेनं याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण या महिलेचा पाठलाग करत असल्याचा दिसून आलं.
घाटकोपरहून बस निघाली, हायवेला सुसाट सुटली; तितक्यात मृतदेह सापडला अन् थरकाप उडाला
पोलिसांनी तरुणाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण याच परिसरात राहणारा असावा असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला आणि १२ तासांच्या आत चोरट्याला डोंबिवलीत त्याच्या घरी जाऊन अटक केली. कानू वघारी असं या चोरट्याचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळील सर्व पैसे खर्च झाले. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपीकडून ४० हजाराचं मंगळसूत्र हस्तगत केलं आहे. आरोपीनं याआधी अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
लग्नात नाचताना तोल गेला, जमिनीवर कोसळले; नातेवाईकांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याचं नव्हतं
विशेष म्हणजे तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवले. त्यावेळी कानू वघारीच्याआईलादेखील सीसीटीव्ही दाखवण्यात आले. आईने मुलाला लगेच ओळखले. हा माझा मुलगा आहे, तो आता घरी आहे असं आईनं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलीस तातडीनं कानूच्या घरी पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here