कोणते शेअर्स घसरले
निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात, इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी ०.६४ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय बीपीसीएल, एचसीएल टेक, पॉवरग्रीड आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही लाल चिन्हासह बंद झाले.
आशियाई शेअर बाजारात घसरण
चीनमधील कोविड-१९शी संबंधित धोरणांमुळे आणि बुधवारी फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाबाबत सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी अमेरिकन बाजारातील ब्रेकनंतर आशियाई शेअर बाजारांमध्येही घसरणीचा कल दिसून आला. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली तर दुसरीकडे हाँगकाँगच्या वायदे बाजारातही घसरण दिसली.
SGX निफ्टीची नकारात्मक सुरुवात
सिंगापूर एक्स्चेंजवर निफ्टी फ्युचर्स १५ अंकांनी घसरला. परिणामी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक होण्यास संकेत मिळाले.
तेलाच्या किमती वाढल्या
अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरीमध्ये घट झाल्यामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमतीत उसळी पाहायला मिळाली. पण OPEC+ त्याच्या आगामी बैठकीत उत्पादन धोरणात कोणतेही बदल करणार नाही, ज्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ मर्यादित होते, अशी चिंता कायम राहिली.
मंगळवारही तेजीची स्थिती
दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी मंगळवारी सलग सहाव्या व्यवहारी दिवशीही कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा सर्वकालीन उच्चांक गाठला. इतर आशियाई बाजारातील मजबूत कल आणि परकीय भांडवलाचा ओघ चालू राहिल्याने बाजार तेजीत राहिले. सेन्सेक्स १७७.०४ अंकांनी म्हणजेच ०.२८ टक्क्यांनी वाढून ६२,६८१.८४ अंकांवर बंद झाला. तर व्यापारादरम्यान एका वेळी निर्देशांक ३८२.६ अंकांवर चढला. तसेच निफ्टीही ५५.३० अंकांच्या म्हणजेच ०.३० टक्क्यांच्या वाढीसह १८,६१८.०५ या त्याच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला.
गुंतवणूकदारांचा विश्वास
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ३२,३४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ते निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. आकडेवारीनुसार, FII ने सोमवारी ९३५.८८ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले.