बिहार : स्टेशनवर एका तरुणाने आपल्या मेव्हण्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण, यानंतर तरुणाची अशी काही लफडी समोर आली सगळेच हादरले. मेव्हण्याने ही बाब लगेच कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीय स्टेशनवर पोहोचले तेव्हा जे सत्य समोर आले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

स्टेशनवर जेव्हा तरुणाच्या दोन बायकांचं आमने-सामने झालं तेव्हा त्याने आणखी लग्न केल्याचं समोर आलं आहे. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत छोटू नावाच्या या तरुणाला चार राज्यात सहा बायका असल्याचे उघड झाले. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलेही आहेत. त्याला दीड वर्षांपूर्वी सोडलेल्या महिलेपासून दोन मुलेही आहेत. ही घटना बिहारमधील जमुई इथली आहे.

‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच

सोमवारी सायंकाळी छोटूची पत्नी मंजूचा भाऊ विकास कोलकाता इथे जाण्यासाठी जमुई स्टेशनवर आला. त्यामुळे त्याची नजर त्याचा मेव्हणा छोटूवर पडली. त्याने पाहिले की छोटूसोबत एक बाई आहे आणि ते ट्रेनची वाट पाहत आहे. विकासने तत्काळ त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी स्टेशन गाठून छोटूला त्याच्यासोबत असलेल्या महिलेसह पकडले. महिलेला विचारले असता ती माझी पत्नी असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तेव्हा विकासने छोटूला विचारले की तू माझ्या बहिणीला (मंजू) कधी घेऊन जाणार आहेस. या प्रश्नावर छोटू गप्प राहिला आणि काहीच बोलला नाही.

पोलीस ठाण्यात जाताच धक्कादायक सत्य समोर…

विकासने छोटूला त्याच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात नेले. पत्नी मंजूची आई कोबिया देवी यांनी पोलिसांना सांगितले की, २०१८ साली माझ्या मुलीचे छोटूसोबत लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. सुमारे दीड वर्षापूर्वी मुलाचे औषध आणण्याच्या बहाण्याने जावई छोटू घरातून सायकल घेऊन निघून गेला. त्या दिवसानंतर त्याची काहीच माहिती नव्हती. आज मुलगा विकास याने त्याला दुसऱ्या महिलेसोबत स्टेशनवर पकडले.

Maharashtra Weather Alert: ऐन थंडीत राज्यात पाऊस कोसळणार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
छोटूच्या ६ बायका आहेत…

छोटू हा ऑर्केस्ट्रामध्ये गायक म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने चार राज्यातील सहा महिलांशी लग्न केले आहे. छोटूने चिनावेरिया, सुंदरतांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथील महिलांशी लग्न केले आहे. छोटूची मुलंही सगळ्यांसोबत आहेत.

VIDEO : जेवणाचा घास, बिअर, टेबल, सगळं फेकून मारलं; नवी मुंबईत हॉटेलमधील हाणामारी व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here