ys sharmilas car towed: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेननं उचलली आहे. विशेष म्हणजे जगन यांची बहिण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शर्मिला रेड्डी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला.

पोलिसांनी कार थांबवल्यानंतर शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली. शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जुलै २०२१ मध्ये रेड्डी यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.
एक दिवसापूर्वीच अज्ञातांनी शर्मिला यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्याविरोधात शर्मिला गो बॅक अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवली. त्यावेळी बसमध्ये २० जण होते. ते वेळीच खाली उतरले. त्यामुळे अनर्थ टळला. शर्मिला कार्यकर्त्यांसोबत नरसम्पेटा येथे जेवणासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.