Sanjay Raut : किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. पण शिवछत्रपतींचा अवमान निमुटपणे ऐकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी विचारला. राज्य सरकारचा शिवप्रतापदिन सोहळा हे ढोंग आहे. जर राज्यपालांना हटवलं असतं आणि भाजप प्रवक्त्याला पदावरुन दूर केलं असतं तर शिवप्रताप दिनाचं महत्त्व वाढलं असतं, असं राऊत म्हणाले.

हायलाइट्स:
- शिवाजीराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजूनही राजभवनात
- यावर मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार तोंड शिवून बसलंय
- छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का?
- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा जळजळीत सवाल
किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. पण शिवछत्रपतींचा अवमान निमुटपणे ऐकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी विचारला. राज्य सरकारचा शिवप्रतापदिन सोहळा हे ढोंग आहे. जर राज्यपालांना हटवलं असतं आणि भाजप प्रवक्त्याला पदावरुन दूर केलं असतं तर शिवप्रताप दिनाचं महत्त्व वाढलं असतं, असं राऊत म्हणाले.
“महाराष्ट्राचा आणि शिवाजीराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजूनही राजभवनात आहेत आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार तोंड शिवून बसलंय. तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजूनही त्यांच्या जागी बसलेत, त्यांच्यावरही कारवाई नाही, उलट त्यांचे नेते त्यांचं लंगडं समर्थन करतायेत. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल करत महाराजांचा अवमान होत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हतबलतेने पाहतंय आणि आज सरकार शिवप्रतापदिन साजरा उत्साहात साजरा करतंय, हे त्यांचं ढोंग आहे”, अशा शब्दात राऊतांनी शिंदे सरकारवर तोफ डागली.
उदयनराजे भावुक, पत्रकार परिषदेत डोळ्यात अश्रू
छत्रपती शिवरायांचा ज्याप्रकारे अपमान होतो आहे, तो दिवस पाहण्याआधी मी मेलो असतो तर बरं झालं असतं. शिवाजी महाराजांची ही अवहेलना पाहवत नाही, अशी खंत व्यक्त करताना उदयनराजेंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सोमवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे कमालीचे भावुक झाले होते. छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले अत्यंत व्यथित होताना दिसले. उदयनराजे भोसले यांनी येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचेही सांगितले. तसेच आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेटून या मुद्द्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.