मुंबई : हल्ली चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहादूर सिंग असं आरोपी चोराचं नाव असून तो ATM मधून पैसे चोरण्यामध्ये तरबेज होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चोरलेल्या पैशांचं तरुण काय करायचा हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या पैशांना तो मुंबईत असलेल्या त्याच्या प्रेयसीवर उधळायचा. तिच्यासोबत मौज करण्यासाठी तो चोरीही करायचा.
पोलिसांनी अखेर आरोपी बजरंगला मंगळवारी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने अनेक चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे. तो चोरी करण्यासाठी जिल्ह्यात आला होता. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत त्याने अनेक खळबळजनक खुलासे केल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही त्यांची अनेकदा तुरूंगात रवानगी झाली आहे. आरोपी बजरंग बहादूरने पोलिसांना सांगितले की, तो त्याच्या प्रेयसीची पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी फसवणूक करायचा.