Bike Accident News: दुचाकीच्या ट्रायलवेळी एका तरुणाचा मृत्यू झाला. नव्या स्पोर्ट्स बाईकच्या ट्रायलसाठी दोन मित्र निघाले होते. त्यांनी भरधाव वेगात बाईक पळवली. यावेळी त्यांची बाईक दुभाजकाला धडकली. त्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

 

bike trail
इंदूर: दुचाकीच्या ट्रायलवेळी एका तरुणाचा मृत्यू झाला. नव्या स्पोर्ट्स बाईकच्या ट्रायलसाठी दोन मित्र निघाले होते. त्यांनी भरधाव वेगात बाईक पळवली. यावेळी त्यांची बाईक दुभाजकाला धडकली. त्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

भवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेमावर रोड येथील तौल कांटच्या समोर रविवारी रात्री १२ च्या सुमारास बाईकला अपघात झाला. त्यात सोनू चौहान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. सोनू बाईकवर मागे बसला होता. बाईक चालवणाऱ्या शुभम राजपूतला दुखापत झाली आहे. सोनू कुरिअर कंपनीत काम करायचा. तर शुभम एका ठिकाणी मुनीम म्हणून कार्यरत आहे.
लग्नात नाचताना तोल गेला, जमिनीवर कोसळले; नातेवाईकांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याचं नव्हतं
शुभम आणि सोनूचा मित्र यशनं स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. यश बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. सगळे मित्र बाईकची ट्रायल घेत होते. सोनू आणि शुभम ट्रायल घेण्यासाठी निघाले. शुभम बाईक चालवत होता, तर सोनू मागे बसला होता. भरधाव वेगात असलेली दुचाकी दुभाजकाला धडकली. अपघातात सोनू जबर जखमी झाला. उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला. निधनाबद्दल समजताच सोनूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. फेब्रुवारीत सोनूच्या बहिणीचं लग्न होतं.
आजोबांचं पोट दुखू लागलं, फुग्यासारखं टम्म फुगलं; डॉक्टरांनी तब्बल १८७ नाणी बाहेर काढली
अपघाताबद्दल समजताच पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचली. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे सोनूचा मृत्यू झाला. बाईक अतिशय वेगात होती. शुभमचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि ती दुभाजकावर जाऊन आदळली अशी माहिती प्राथमिक तपासातून उघडकीस आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here