नवी दिल्ली: शेअर बाजाराचे दिग्गज गुंतवणूकदार आणि दिवंगत राकेश झुनझुनवाला, ज्यांना ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाते, यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ‘फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट २०२२’ मध्ये आपली मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. फोर्ब्सच्या यादीत एंट्री घेत श्रीमती झुनझुनवाला आता देशातील अब्जाधीशांपैकी एक बनल्या आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्याने ३० वे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, नायका कंपनीची मालकीण फाल्गुनी नायर यंदाच्या फोर्ब्सच्या यादीतील नवीन चेहऱ्यांपैकी एक आहेत.

रेखा झुनझुनवालांची निव्व्ल संपत्ती
रेखा झुनझुनवाला यांनी पती राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच फोर्ब्स भारतीय श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. अहवालानुसार, ५९ वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ५.९ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ४७,६५०.७६ कोटी रुपये आहे. झुंजनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजारातील ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यापारी जगतासह सर्वांनाच धक्का बसला.

भारतीय अब्जाधीश अधिकच श्रीमंत! दशकभरानंतर धनाढ्यांच्या यादीत मोठे उलटफेर, पाहा कोणाला मिळाला नंबर १ चा बहुमान
राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२व्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूपूर्वी झुनझुनवाला यांची तब्येत चिंतेचे कारण बनली होती, कारण बहुतांश सार्वजनिक कार्यक्रमात ते व्हीलचेअरवरही दिसायचे. झुनझुनवाला किडनी आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांनी त्रस्त होते, असे अहवालात सांगण्यात आले होते.

पती राकेश झुनझुनवाला पेक्षा खूप पुढे
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, यापूर्वी २०२१ च्या फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ५.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील अब्जाधीशांच्या यादीत ३६व्या स्थानावर होते. मात्र, नवीन जाहीर झालेल्या २०२२ च्या यादीत झुनझुनवालांची जागा त्यांची पत्नी रेखा यांनी घेतली असून त्या ३६व्या ऐवजी देशातील ३०वी श्रीमंत व्यक्ती आहेत. रेखा आणि राकेश झुनझुनवाला यांना तीन मुले – मुलगी निष्ठा आणि जुळी मुले आर्यमन व आर्यवीर आहेत.

Forbes टॉप २० आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, तीन भारतीय महिलांना स्थान
बातम्यांचा प्रभाव
रेखा झुनझुनवाला यांना फोर्ब्सच्या यादीत ३० वे स्थान मिळाल्याच्या बातम्यांचा प्रभाव त्यांच्या पोर्टफोलिओमधील समभागांच्या किमतींवरही दिसून आला. मंगळवारी दिवसाच्या व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत टायटनच्या शेअर्सची किंमत रु. २,६१२.०० वर पोहोचली होती. याशिवाय स्टार हेल्थ ६४३.७० रुपयांवर, तर मेट्रो ब्रँड्स ८१७.९० रुपयांवर बंद झाला.

महिंद्रा, नीलेकणींच्याही पुढे नागपुरचे सत्यानारायण नुवाल; टॉप शंभर श्रीमंतांमध्ये ७२ वे स्थान
श्रीमंतांच्या यादीत अदानी अव्वल
याशिवाय फोर्ब्सच्या यादीबद्दल बोलायचे तर आशियातील श्रीमंत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर असून रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. तसेहच तिसऱ्या क्रमांकावर राधाकिशन दमानी, चौथ्या क्रमांकावर सायरस पूनावाला आणि पाचव्या क्रमांकावर शिव नाडर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here