Ragging In Nagpur Medical College: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल,) नागपूर येथे एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

 

nagpur medical college
नागपूरः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल,) नागपूर येथे एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने रॅगिंग घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द केली असून त्यांना वसतिगृहात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. ( nagpur medical college)

इंटर्नशिप करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला वसतिगृहात बोलावून त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ संबधित विद्यार्थ्याने राष्ट्रीय रॅगिंग विरोधी समितीकडे पाठवून या प्रकाराची तक्रार केली होती. या समितीने ही तक्रार नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाला पाठविली. विद्यापीठाने मेडिकल प्रशासनाला तो व्हिडिओ व तक्रार पाठवून कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रॅगिंग करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द केली तसेच त्यांना वसतिगृहाच्या बाहेर काढले.

वाचाः पाकिस्तानच्या ड्रोनची शिकार करणार ‘अर्जुन’; भारतीय सैन्याचा हवेत उडणारा धाडसी कमांडो

या संदर्भात बुधवारी अजनी पोलिस स्टेशन येथे मेडिकल प्रशासना तर्फे तक्रार देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना अटक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच डॉ. गजभिये यांनी मेडिकलच्या अँटी रॅगिंग कमिटीची बैठक घेऊन त्यात असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले होते.

वाचाः ‘एक्स्प्रेस वे’वरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आता ‘सुरक्षा’; अशी असेल सुरक्षा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here