beed news today marathi, तिच्यासाठी गेला तुरूंगात अन् जामिनावरच बाहेर येताच पुन्हा तिला घेऊन पळून गेला… – went to jail for girlfriend and ran away with her again soon he got out on bail beed news
बीड : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका २२ वर्षीय तरुणास तुरूंगवारी घडली आहे. मात्र, जामिनावर सुटका झाल्यावर जिच्यामुळे कारागृहात राहावे लागले, तिला घेऊन त्याने पुन्हा पलायन केले. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस मनोहर नेटके वय २२ असे आरोपी तरुणाचं नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तुरुंगात रवानगी झाली. मात्र, जामिनावर सुटल्यावर त्याच मुलीला त्याने फूस लावून पळवले. इथे एक जमेना अन्…! तरुणाच्या २ राज्यांमध्ये ६ बायका; कसा जमलं भाऊला? वाचाच या प्रकरणी मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून बीडच्या आष्टी ठाण्यात तेजस नेटकेवर पुन्हा एकदा अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने आष्टी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, ज्या मुलीमुळे आपल्याला तुरूंगवास भोगाव लागला, त्याच मुलीला परत पळून नेल्याने नेमका गुन्हा दाखल केलेला आणि सजा भोगलेली त्यानंतर मुलीलाही पळून घेण्यात त्या मुलाला यश आलं. मग यामध्ये मुलीच्या घरच्यांनी याआधी गुन्हा दाखल केलेला खोटा होता की खरा. जर गुन्हा खरा होता तर पुन्हा मुलगी त्याच व्यक्तीसोबत का पळून जाते, अशा पद्धतीच्या चर्चेंना आष्टीसह बीड जिल्ह्यात कुजबुज सुरू झाली आहे.