खासगी प्रवासी बसमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. बसमधील एक प्रवासी अतिशय गंभीर जखमी होता. त्याच स्थितीत तो प्रवास करत होता. काही तासांनंतर त्याचा मृत्यू झाला. प्रवासी जखमी असल्याचं समजल्यानंतर चालकानं बस रुग्णालयात नेली. तिथे प्रवाशानं अखेरचा श्वास घेतला.

प्रवाशानं बसमधील सहप्रवाशांकडे याबद्दल विचारणा केली. यानंतर बसमध्ये एक जखमी प्रवासी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या प्रवाशाच्या मानेला जखम झाली होती. त्यातून रक्तस्राव सुरू होता. यानंतर बस कासा रुग्णालयाकडे वळवण्यात आली. प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्या प्रवाशाच्या खिशात ब्लेडसारखी वस्तू सापडली. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.