वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी परिचित आहे. कारण आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करत गेलने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहे. पण गेल हा बिनधास्तपणे जगणारा क्रिकेटपटू आहे. करोनाच्या काळातही गेल काही जणांबरोबर मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेलचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना गटारीची आठवण आल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी गेलचे दोन व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. एका व्हिडीओमध्ये गेल फक्त एकटाच डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये गेलबरोबर काही लोकंही भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

या पहिल्या व्हिडीओमध्ये गेलच्या हातात एक लाल रंगाचा ग्लास आहे. हा ग्लास घेऊनच गेल हा भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलचा डान्स त्याच्या चाहत्यांनाही चांगलाच आवडलेला पाहायला मिळत आहे. कारण हे चाहते गेलला चांगलाच पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता दुसऱ्या व्हिडीओमध्ये गेल कसा डान्स करतोय, ते पाहाल तर हसतच राहाल.

हा जसा क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे तसा तो बिनधास्तपणे राहण्यासाठीही प्रसिद्ध आहे. भारतामधील आयपीएल त्याने चांगलीच गाजवली होती. पण मैदानाबाहेरच्या पार्ट्यांमध्येही तो चांगलाच रंगलेला पाहायला मिळायचा. गेल जेव्हा डान्न फ्लोअरवर उतरायचा तेव्हा ललना त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या, असे म्हटले जायचे. गेलचे आयुष्य विविध रंगांनी भरलेले आहे.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये तर गेल हा दोन जणांबरोबर भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलपेक्षा या दोन व्यक्ती जरा जास्तच भन्नाट नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमझ्ये एक ललनाही येते. पण हा व्हिडीओ जर तुम्ही पाहाल तर पोट धरून हसत राहाल, हे मात्र नक्की.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे सर्वच खेळाडू आपल्या घरी आहेत. पण गेल मात्र करोनाच्या काळातही जीवाची वेस्ट इंडिज करत असल्याचेे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here